*कोकण Express*
*सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत नॅशनल पोस्ट विक म्हणून ११ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान होणार साजरा*
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे नॅशनल पोस्ट वीक येत्या 11 ते 16 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे सोमवारी 11 अक्टोबर रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक *दिपक कदम यांच्या टपाल तिकिटाचे उदघाटन ।my stamp। करण्यात आले आहे. दिपक कदम यांनी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी साठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय टपाल विभागातर्फे त्यांना तिकिटांच्या स्वरूपात कौतुकाची थाप देण्यात आली आहे. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा डाकघर अधीक्षक श्री.ए. बी. कोड्डा, डाक निरीक्षक मनोज पंवार, डेव्हलपमेंट ऑफीसर बालाजी मुंडे,मुख्याध्यापक अशोक ठोंबरे, विकास मुणगेकर ( डाक आवेक्षक , देवगड उपविभाग) हे उपस्थित होते.