बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सावंतवाडीत आंदोलन

बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सावंतवाडीत आंदोलन

*कोकण Express*

*बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सावंतवाडीत आंदोलन…*

*व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद नाही; योगी सरकारचा निषेध, पोलिसांकडून आंदोलक स्थानबद्ध…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्यावतीने सावंतवाडी शहरात जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी योगी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र महाविकास आघाडीने दिलेल्या सावंतवाडी बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. येथील गांधी चौकात हे आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना स्थानबद्ध केले.

यावेळी शिवसेना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, समीर वंजारी, इफ्तिकार राजगुरू, हिदायतुल्ला खान, राघवेंद्र नार्वेकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दर्शना बाबर-देसाई, जास्मिन लक्ष्मेश्वर, अशोक दळवी, देवा टेमकर, अपर्णा कोठावळे, सावली पाटकर, प्रशांत कोठावळे, बाबू कुडतरकर आदींसह मोठ्या संख्येने महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!