*कोकण Express*
*तलाठी संघटनेच्या वतीने तहसिलदार कार्यालयासमोर करण्यात आले निदर्शन*
*पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या विधानाचा केला निषेध*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डूबल (आप्पा) यांच्या संदर्भात राज्य कार्यकारिणी व्हाट्सअप ग्रुपवर पाठविलेल्या असंविधानिक संदेश पाठविला. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, संवर्गातील अव्वल कारकून व नायब तहसिलदार यांना अपमानित करण्यात आले. याचा निषेध म्हणून तलाठी संघटना तालुका अध्यक्ष तथा नरडवे तलाठी गणेश गोडे यांचे नेतृत्वाखाली कणकवली तहसीलदार कार्यालय समोर सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत निदर्शन करण्यात आले. तसेच संघटनेच्या विजयाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे या आंदोलनाचा भाग म्हणून उद्या दि. १२ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन वेळेच्या समाप्तीनंतर सायंकाळी ५.०० वा. सर्व तलाठी हे त्यांचेकडे ऑनलाईन कामाचा डाटा असणारे टोकन तहसीलदारांकडे सुपूर्द करणार असल्याचे संघटनेमार्फत सांगण्यात आले आहे.