*कोकण Express*
*जानवली बॉक्सवेल ब्रिजच्या उपोषणकर्त्यांनची संदेश पारकर यांनी घेतली भेट..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर जानवली येथे बॉक्सवेल मंजुर होऊन मिळणेसाठी जानवली ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
तसेच श्री.संदेश पारकर यांनी त्वरीत खासदार श्री.विनायक राऊत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधुन या संदर्भातील मागण्यांची माहिती दिली.
यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अँड.हर्षद गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.