*कोकण Express*
*फोंडाघाटचा अखिलेश एमआयटी मध्ये टॉपर…*
पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होताना फोंड्याच्या अखिलेश अजित नाडकर्णी यांनी ९.४७ सीजीपीए मिळवून टॉपरच्या यादीत स्थान पटकावले. याप्रित्यर्थ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कडून, त्याला पुण्याच्या संस्कृतीला साजेसा पोषाख आणि पदवी देऊन गौरव करण्यात आला.
याबद्दल भावना व्यक्त करताना अखिलेश यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक प्राध्यापक वर्ग आणि सुह्रदांना दिले. फोंड्या सारख्या ग्रामीण भागातून उच्चशिक्षित शहरात जाऊन मिळवलेले कष्टप्रद यश कोकणातील युवा-युवतींना प्रेरणादायी आहे. त्यामुळे अखिलेशचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना, लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी, ही बाब समजतात फोन वरून त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दि ल्या…