*बॉक्सवेलसाठी जानवली ग्रामस्थांचे आंदोलन*
*बॉक्सवेलच्या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार : आ. नितेश राणे*
*आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांची भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील जानवली साकेडी फाटा येथे बॉक्सवेल मागणीसाठी जानवली ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण आंदोलन केले.या आंदोलनाला भाजपा आमदार नितेश राणे,भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी आमदार श्री.राणे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले.या बॉक्सवेलसाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच आर्या राणे,बबलू सावंत, काका राणे,संतोष सावंत, पांडुरंग राणे,प्रसाद राणे,चंदू साटम, आदी उपस्थित होते.