*कोकण Express*
*भाजपा कणकवलीच्या वतीने श्रीदेवी दुर्गामातेची उत्साहात प्रतिष्ठापना*
*नवरात्रोत्सवाचे सातत्यपूर्ण ३४ वे वर्ष पूर्ण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने आज मोठ्या उत्साहात श्री देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.ढोल ताशांचा गाजर, फटाक्यांची आतषबाजी करत देवीची मूर्ती श्रीदेवी पटकी देवी मंदिर येथून बाजारपेठ मार्गे मुख्यचौक मधून वाजत गाजत विराजमान करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे हे ३४ वे वर्ष आहे.
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रतिवर्षी श्री दुर्गादेवीचे प्रतिष्ठापना केली जाते नऊदिवस विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, यावर्षी सुद्धा दररोज सायंकाळी ६.३० वाजता दशावतारी नाटक व डबल बारी भजने हिणार आहेत.
दुपारी १२ वाजता दुर्गामातेच्या मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,शशी राणे, सुशील सावंत,संदीप मेस्त्री,अण्णा कोदे,राजन परब,भाई काणेकर,माजी सभापती प्रकाश सावंत, विठ्ठल देसाई,सुशील पारकर,लक्ष्मण घाडीगावकर,संतोष चव्हाण यांच्या सह
प्रदेश कार्यकारिणी महिला सदस्या प्रज्ञा ढवण, जिल्हा परिषद अध्यक्ष् संजना सावंत, नगरसेविका कविता राणे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, कणकवली माजी महिला तालुकाध्यक्ष स्वाती राणे, शहरअध्यक्ष प्राची कर्पे, महिला तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर, नितिका बागवे, लक्ष्मी खंदारे, साक्षी वाळके, असे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.