*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाने घेतली नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांची सदिच्छा भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मंडळाच्यावतीने शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत सर, सचिव काका मांजरेकर, सहसचिव योगेश राऊळ, जयेंद्र रावराणे, अरुण सावंत तसेच सिंधुदुर्ग माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मंदृपकर आदी उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्थेतील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. संस्थाचालकांची सुप्रीम कोर्टातील याचिका संच मान्यता, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या अशा अनेक विषयावर दीर्घ चर्चा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष जी एम. सामंत यांनी केली. वरील सर्व विषयांबाबत आपण तत्काळ योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी यावेळी दिले आरटीई कायदा लागू केल्यानंतर शिक्षक संरचनेमध्ये झालेला बदल भौगोलिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला यामुळे बसलेला फटका तरीदेखील शिक्षणाच्या दर्जाचा आलेख सिंधुदुर्ग जिल्ह्याने कायमच चढत्या क्रमाने ठेवलेला आहे, तो तसाच वाढत राहण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने शासनाचे नियम पाळून कुटुंब नियोजनामध्ये अव्वल दर्जा प्राप्त केला पुढे त्याचा परिणाम पटसंख्यावर झाला. पटसंख्याचे बदललेले निकष हे शाळांच्या मुळावर आले. शिक्षक संख्या कमी झाली व ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अवघड झाले. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे सुचविले. जिल्हातील विविध शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पद भरतीबाबत तसेच थकीत वेतनेतर अनुदान याबाबतही चर्चा झाली.