*कोकण Express*
*कै. श्रीधर नाईक चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवा*
*आमदार नितेश राणे यांची एसपींकडे मागणी*
शहरातील कै. श्रीधर नाईक चौक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व कणकवली पोलीस निरीक्षक यांच्या जवळ केली आहे.
याबाबतच्या पत्रात श्री राणे यांनी म्हंटले आहे की २७ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेच्या वेळी आमच्या राजकीय विरोधकांकडून नरडवे फाटा कणकवली येथील कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याजवळ अनुचित प्रकार घडवून कणकवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, असे मला समजते. तरी आपल्या खात्यामार्फत कै. श्रीधर नाईक पुतळ्या जवळच्या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लवकरात लवकर लावण्यात यावेत. याबाबत निधीची उपलब्धता नसल्यास माझ्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत तरतूद करण्यात येईल. तरी त्वरीत कार्यवाही व्हावी अशी मागणी श्री. राणे यांनी केली आहे.