*कोकण Express*
- *कणकवलीतील स्टेट बँकेत ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याप्रकरणी ‘भाजयुमो’ आक्रमक..*
*पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्या तर आंदोलन छेडण्याचा सरचिटणीस संदीप मेस्त्री यांचा इशारा..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेत काही कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना विनाकारण उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना, पेन्शनर ग्राहकांना रांगांमध्ये उभे करून त्रास दिला जात आहे. या सर्व प्रकारचे आज कणकवलीत तीव्र पडसाद उमटले. भाजपा युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने शाखा व्यवस्थापकांना एकूणच गैरसोयी विषयी जाब विचारला. त्यावेळी ग्राहकांना त्रास दिला जाणार नसल्याचे आश्वासन शाखा व्यवस्थापक श्री. चौधरी यांनी दिले.
भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटक सरचिटणीस संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, उपाध्यक्ष सुभाष मालंडकर, सचिन बांदीवडेकर, आनंद बांदल उपस्थित होते.
यावेळी सुरक्षा रक्षकाची ग्राहकांसोबत अरेरावी असते. ग्राहकांना चुकीची वागणूक देऊ नका. अशी शाखा व्यवस्थापक व शिष्टमंळात चर्चा करत असताना सुरक्षारक्षक वाद घालत होता. यावरुन जोरदार बचाबाची झाली. त्यानंतर सेवा देताना भाषा चांगली ठेवा, सुरक्षा रक्षकाला कामकाजात सुधारणा साठी कर्मचारी व अधिकारी यांना नोटिस काढणे, पेंशन धारक, जेष्ठ नागरिकांसाठी टेबल वाढवा, कर्मचारी वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे अश्या मागण्या शाखा व्यवस्थापक चौधरी यांनी मान्य केल्या आहेत. यासंदर्भात आपण आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार आहे. पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्या तर आंदोलन छेडण्याचा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला आहे.