राणे साहेबांचे राजकीय वजन संपले म्हणणाऱ्यानी स्वतःच स्वतःला किराणा दुकानदार बनवून घेतले

राणे साहेबांचे राजकीय वजन संपले म्हणणाऱ्यानी स्वतःच स्वतःला किराणा दुकानदार बनवून घेतले

 

*कोकण Express*

*राणे साहेबांचे राजकीय वजन संपले म्हणणाऱ्यानी स्वतःच स्वतःला किराणा दुकानदार बनवून घेतले – रूपेश कानडे*

*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले तर शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला राणे साहेबांवर बोलावेच लागते, नाहीतर परत मुंबईला गेल्यावर मातोश्रीच्या अंगणात प्रवेश मिळत नाही. काल जिल्ह्यात आलेल्या महसुल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हाच कित्ता गिरवला.

काल एका पक्षाला बिहारमध्ये हवे ते निवडणूक चिन्ह मिळाले नाही.मिळाले ते बिस्कीट! त्याला स्मरून पक्ष प्रमुखांना खुश करण्यासाठी राणेसाहेबांवर काहीतरी बोलायलाच हवे म्हणून काहीजण इथे येऊन बोलून जातात. पण यांच्या बोलण्याने राणे साहेबांचे राजकीय वजन तसूभरही कमी होणार नाही. पण बोलणाऱ्याची परिस्थिती काय होते याचे जवळचे उदाहरण म्हणजे माजी पालकमंत्री केसरकर आहेत.

काल जिल्ह्यात आलेल्या महसूल मंत्र्यांचा रेडीमध्ये पूर्व नियोजित दौरा असताना त्यांच्या दौऱ्याला अधिकारी गैरहजर राहिले. त्याची तक्रार मुख्य सचिवांजवळ करावी लागते व आम्ही काय किराणा दुकानदार आहोत का विचारावे लागते? खऱ्या किराणा दुकानदारांच्या दारात ग्राहकांची गर्दी असते हे देखील ते विसरले. यांच्या राजकीय दुकानदारीत हे मंत्री असून साधा अधिकारीसुद्धा यांच्याकडे फिरकत नाही, यातच त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय वजन काय आहे, हे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. राणेंवर टीका करणाऱ्यांचे फक्त शारीरिक वजन वाढते, राजकीय नाही हे वास्तव जिल्ह्यातील जनतेला कळून चुकले आहे. मंत्र्यांनी सत्ता आहे तोवर जनतेच्या पैशांनी जिल्ह्यात काढलेल्या पर्यटन दौऱ्यात खुशाल आपले मन रिझवावे, पण मातोश्री किराणा दुकानातील तागडीत वरचढ होण्यासाठी राणे साहेबांवर टीका करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न टाळावा, हाच आमचा सल्ला राहील असे भारतीय जनता युवा मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांनी बजावले आहे. तसेच अधिकारी न आल्यावर मी काय किराणा दुकानदार वाटलो का म्हणत म्हणून मुख्य सचिवांना धारेवर धरताना, तमाम किराणा दुकानदारांना कमी लेखले आहे. किराणा दुकानदाराना तुच्छ लेखणाऱ्या महसूल राज्यमंत्र्यांचा भारतीय जनता यूवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध करत आहे, असे रुपेश कानडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!