*कोकण Express*
*शेरले- निगुडे- सोनुरली रस्ता तात्काळ दुरुस्त करा…*
*रस्त्यावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करा…*
*निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांचे उद्या उपोषण*
*बांदा ः प्रतिनिधी*
निगुडे सोनुर्ली रस्ता हा नाबाड अंतर्गत सन २०१७ – २०१८ साली 50 लक्ष एवढा निधी खर्च करून नवीन करण्यात आला होता परंतु रस्त्याला अवघे दोन वर्ष व्हायच्या अगोदर रस्त्यावरून खनिज कंपनीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे सदर वाहतूकदारांना आणि गौण खनिज कंपनी सांगून सुद्धा वाहतूक बंद झाली नाही त्यामुळे निगुडे सोनुरली रस्त्या वरून अक्षरशा मोटर सायकल चालवणे सुद्धा कठीण झाले आहे ठिक ठिकाणी मोठे खड्डे पडलेत सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र खड्ड्यामध्ये नुसती माती टाकून खड्डे भरण्याचे व ठेकेदाराचे पोट भरण्याचं काम करत आहे काही ठिकाणी तर ओव्हरलोड वाहतुकीमुळे ब्रिज खचले आहेत त्याची तात्काळ डागडुजी व्हावी व सदर रस्त्यासाठी खनिकर्म विभागाकडे असलेला निधी हा या रस्त्यासाठी खर्च करण्यात यावा तसेच रस्त्याला वाढलेली दुतर्फा झाडे तोडण्यात यावी दक्षिण पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री देवी माऊली सोनुरली मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते या खनिकर्म विभागाचा निधी सर्व ठिकाणी खर्च करण्यात यावा निधी हा सर्व ॲम्बुलन्स वर खर्च करण्यात आला आहे त्यामुळे ज्या गावात गौण खनिज आहे अशा गावातील आधी रस्ते सुधारा तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करा तसेच दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे निगुडे तुन जाणारा मार्ग बंद करावा या कंपनीला हायवे मार्गावरून रस्ता उपलब्ध असतानाही निगुडे गावातून वाहतूक केली जाते सदर डंपर मुळे संपूर्ण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केला जातो याविरोधात उद्या सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी या ठिकाणी उपोषण करण्यात येणार आहे असे सरपंच गावडे यांनी सांगितले आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे.