*कोकण Express*
*श्री.राधाकृष्ण सप्ताहाची सांगता पालखी प्रदिक्षणेने संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
श्री.राधाकृष्ण मंदिरातील सप्ताहाची आज सांगता झाली.काल रात्री भव्य दिंडी निघाली दिंडीमध्ये कुडाळ येथील हत्ती, घोडे, कोंबडा, ड्र्यगन यांनी लक्ष वेधुन घेतले.झालेल्या भजन स्पर्धा आणि रेकाॅर्ड डान्स स्पर्धचे बक्षीस वितरण पार पडले.११०००/- पहीले बक्षीस वैभववाडी भजन मंडळ ,७७७७/- द्वितीय बक्षीस तांबळडेग भजन मंडळाला, ५५५५/- तृतीय बक्षीस बाव कुडाळ संघाला मिळाले.सर्व संघानी R.K.GROUP चे कौतुक केले एवढी शिस्तप्रिय आयोजन आम्ही यापुर्वी पाहीले नाही भवीष्यात कायम आम्ही भाग घेवु अशी प्रतीक्रीया त्यांनी दिली.बाजारपेठेत रात्री येणाऱ्या लोकांसाठी कट्टा मित्रमंडळ गांधी चौक या ठिकाणी पाव भाजी वाटप रात्र भर चालु होती.याचाही आस्वाद लोकांनी घेतला.मोठ्ठी गर्दी असुनही देव श्री.राधाकृष्ण आणि श्री.मारुती यांनी सर्व छान पार पाडुन घेतले.अजित नाडकर्णी यांनी R.K.GROUP ला शुभेच्छा देताना यानंतरही फोंडाघाट मधील कोणत्याही चांगल्या गोष्टीत तन,मन,धन, सर्वातपरी योगदान देवु अशी प्रतीक्रीया दिली उत्कृष्ट पकवाज वादनासाठी११११/- बक्षीस आणि रेकाॅर्ड डान्स स्पर्धत भाग घेणार्र्या सर्वांना उत्तेजनार्थ पारीतोषीके दिली मंडळांनी अजित नाडकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.