गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत दिवस साजरा

गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत दिवस साजरा

*कोकण Express*

*गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत दिवस साजरा*

*सिंधुदुर्गनगरी,ता.०२:*

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी जंयती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित ‘स्वच्छ भारत दिवस’ उत्साहत पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.


२ ऑक्टोबर महात्मा गांधी जंयती हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणुन संबोधला जातो. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन ग्रामपंचायत व तालुकास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती स्तरावर स्वच्छता रथ तयार करुन स्वच्छ भारत मिशन ग्रामिण व जलजीवन मिशन बाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. तर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेल्या प्लॉस्टिक संकलन शेड उद्घाटन, सार्वजनिक शौचालय उद्घाटन, करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ग्रामप्म्चायत कार्यक्षेत्रात स्वच्छता शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भोगवे ग्रामपचायत कार्यक्षेत्रात सागर किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात मा. पतप्रधान यांच्या संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!