वैभववाडीत बंद फ्लॅटचे कुलुप तोडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यानी केली लंपास

वैभववाडीत बंद फ्लॅटचे कुलुप तोडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यानी केली लंपास

*कोकण  Express*

*वैभववाडीत बंद फ्लॅटचे कुलुप तोडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यानी केली लंपास*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

वैभववाडी शहरात गुरव कॉम्प्लेक्स येथे घडली. याबाबत सुमीता सुधाकर पावसकर वय २८ रा. वैभववाडी यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारपेठेतील दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली.

सुमीता पावसकर या मूळ कणकवली कलमठ येथील आहेत. वैभववाडी येथील जुन्या एस.टी.बस स्थानकाच्या जवळ त्यांचे अनेक वर्षापासुन फुलांचे व नारळ, किरकोळ कडधान्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून पावसकर कुटुंबिय आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. या वर्षी गणेश चतुर्थी सणाला दुकान व्यवसायातून मालाची विक्री करून जमा झालेले १ लाख ५० हजार रुपये त्यांनी बेडरूम मधील स्टीलच्या डब्यात ठेवले होते.गुरुवारी ३० सप्टेंबर रोजी फिर्यादी सुमीता पावसकर ही सकाळी ९ वाजता कसाल, ता. कुडाळ येथे आठवडा बाजारासाठी गेली होती. त्यानंतर घरातील अन्य माणसे आपापल्या काम निमित्त बाहेर गेली. त्यानंतर सकाळी ११ वाजता सुमीता हिची आई संगीता हीने बेडरूमला कुलूप लावून हॉलला कुलूप न लावताच दुकानात गेली. दरम्यान त्यांच्याकडे एक व्यापारी दुकान साहित्याचे शिल्लक पैसे नेण्यासाठी आला होता. त्यावेळी सुमीता हिची आई संगीता आपल्या फ्लॅट मध्ये गेली असता बेडरूमचा कुलूप केलेला दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्याने स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेल्या पैशांची शोधाशोध केली असता यामध्ये ठेवलेले पैसे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाणे गाठून चोरीची रीतसर तक्रार दाखल केली. यात दोन हजाराच्या दोन नोटा आणि पाचशे रुपयाच्या २९२ नोटा असे दीड लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सुमीता यांनी या चोरीबाबत त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करीत असलेल्या दोघांची नावे दिली आहेत. त्यानुसार शहरातीलच मच्छीमार्केट येथे राहणारा राजू विलास मोहिते (वय १९) व सचिन तुकाराम चव्हाण (वय २३) यांच्यावर भादवी कलम ३८० व ४५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघानाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रविण देसाई करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!