*कोकण Express*
*कासार्डे विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*
*तळेरे ः प्रतिनिधी*
जगाला अहिंसा, सत्य, आणि सहिष्णुतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 जयंती व जय जवान जय किसान घोषणेचे प्रणेते भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची ११७वी जयंती कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली.
कासार्डे शिक्षण संस्था स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर आणि प्राचार्य मधुकर खाड्ये यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन या दोन्ही महात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक नारायण कुचेकर, शिक्षक भाग्यश्री बिसुरे, दत्तात्रय मारकड, आरती पेडणेकर, परब, विनायक पाताडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी निकेत पावसकर, प्रशांत सावंत व दिपेंद्र मेस्त्री आदीची उपस्थित होती.