*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्यातील एस टी डेपो मध्ये लॉटरी स्टॉल साठी परवानगी*
*मनसे लॉटरी सेनेची मागणी राज्य सरकारकडून मान्य*
*मुंबई*
कोरोना काळात महाराष्ट्र पेपर लॉटरीचा खप खुप कमी झाला. यासाठी मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी पूर्वीचे लॉटरी आयुक्त अमितकुमार सैनी यांना महाराष्ट्र राज्यातील एस. टी. डेपोच्या आवारात इतर स्टॉल बरोबर लॉटरीच्या स्टॉल पण परवानगी द्यावी अशी मागणी करून तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा अशी मागणी केली होती. आत्ताचे नवनिर्वाचित लॉटरी आयुक्त ई. रवींद्रन साहेब यांच्या जवळ पण हा प्रस्ताव पारित होण्यासाठी पाठपुरावा केला होता.
आत्ताचे जिएसटी कमिशनर व लॉटरी आयुक्त ई. रवींद्रन साहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कलेक्टर पण होते. त्यांच्या प्रस्तवास सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य सरकारने हिरवा कंदील देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस. टी. डेपोच्या आवारात काढलेल्या निविदा प्रक्रियेत लॉटरी स्टॉलला सुध्दा परवानगी दिली.
मनसे लॉटरी सेनेच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता दिल्या बद्दल मनसे लॉटरी सेनेच्या वतीने लॉटरी आयुक्त ई.रवींद्रन यांचे आभार मानले.तसेच ईतर जिल्ह्यातील एस. टी. डेपो मध्ये पण लॉटरी स्टॉलच्या निविदा काढण्यासाठी राज्य सरकार जवळ पाठपुरावा करण्याची मागणी केली. वेळोवेळी लॉटरी विक्रेत्यांच्या पाठीशी उभे असलेल्या मनसे लॉटरी सेनेचे महाराष्ट्र राज्यातील तमाम लॉटरी विक्रेत्यांनी मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे,युवा नेते अमित ठाकरे, मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, कार्याध्यक्ष सुहास महाडीक, सरचिटणीस विनायक गोविलकर, संयुक्त सरचिटणीस कल्पेश सावंत, चिटणीस मनोज आंबेकर व चिटणीस संजय इंदप यांचे आभार मानले.

