दुर्मिळ रक्तदात्याचे सिंधुदुर्गात रक्तदान

दुर्मिळ रक्तदात्याचे सिंधुदुर्गात रक्तदान

*कोकण Express*

*दुर्मिळ रक्तदात्याचे सिंधुदुर्गात रक्तदान*

*बाँबे ब्लड ग्रुप *जागतिक रक्तदाते विक्रम यादव* यांचे जिल्ह्यात रक्तदान*

*_ऐच्छिक रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला केले रक्तदान_*

. दि.३० सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत सांगली तासगावचे सुपुत्र विक्रम विश्रांत यादव यांनी जगातील अत्यंत दुर्मिळ असे बाँबे ब्लड ग्रुप रक्ताचे रक्तदान केले.
जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नांदोस येथिल श्री. राजाराम गोविंद गावडे वय ६५ वर्षे यांचे एचबी ४ ग्रॅम होते तसेच त्यांचे डायलेसीसही चालू आहे, त्याकरिता त्यांना जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या बाँबे ब्लड ग्रुपच्या ४ सदस्यांपैकी एक सुधीर कांबळी यांनी रक्तदान केले होते, रुग्णाला आणखी एका रक्तबॅगची आवश्यकता होती, त्या करिता जिल्ह्यातील अन्य ३ रक्तदाते तब्बेतीच्या कारणाने रक्त देऊ शकत नव्हते. त्यामुळे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सांगली तासगावचे मित्र दुर्मिळ रक्तदाते श्री. विक्रम यादव हे स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले व त्यांनी अत्यंत अमूल्य असे रक्तदान केले.
विक्रम यादव यांचे हे तब्बल ६६ वे रक्तदान आहे. यापुर्वी त्यांनी रांची, उत्तराखंड,झारखंड,विशाखापट्टणम,आग्रा, विजापूर, बेंगलोर,म्हैसूर, रत्नागिरी, कर्नाटकसह दुबई, पाकिस्तान,बांग्लादेश इत्यादी ९ देशात रक्तदान केेले आहे.
विक्रम यादव आपल्या आई वडिल व पत्नीसह आज सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरीत हजर झाले, यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ, सचिव श्री किशोर नाचणोलकर, श्री.पंकज गावडे (बाँबे ब्लड ग्रुप), श्री.सुधीर कांबळी (बाँबे ब्लड ग्रुप),श्रीम.सपना पडवळ (बाँबे ब्लड ग्रुप) इत्यादींनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर जिल्हा रक्तपेढीत त्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले.यावेळी विक्रम यादव यांच्या या महान रुग्णसेवेबद्दल सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव घुर्ये व डॉ. यादव यांनी पुष्पगुच्छ व शाल घालून त्यांचा सपत्निक सत्कार केला यावेळी विक्रम यांचे आईवडिलही उपस्थित होते.
बाँबे ब्लड ग्रुप हा जगाच्या लोकसंख्येत १० लाख लोकांत फक्त ४ जणांचाच असतो, त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ असाच आहे, तरिही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रक्तपेढींच्या सहकार्याने तब्बल ४ रक्तदाते या गटाचे मालवण तालुक्यात सापडले आहेत, तसेच मालवणात या चारांसह एकूण ८ लोक या रक्तगटाचे सापडले आहेत आणि जिल्ह्यात एकूण १६ ची नोंद झाली आहे, म्हणजेच आपल्या जिल्ह्यात या गटाची संख्या वाढत आहे, त्यातही मालवण तालुका या गटाने सधन असल्याचे समजतेय.
पाच वर्षापूर्वी विक्रम यादव यांच्यामुळेच या गटाची माहिती झाली आणि प्रतिष्ठानने हा गट मालवणमध्ये व जिल्ह्यामध्ये शोधण्याचे अभियान सुरु केले आहे, आता पर्यंत ६५ लोकांची या गटासाठी तपासणी करण्यात आली आहे.
आज विक्रम यादव यांनी जिल्ह्यात येऊन रक्तदान केलेच, त्याच बरोबर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.विक्रम यादव यांनी कधीही मदत लागली तर हाक मारा आपण हजर होऊ असे आश्वासन दिले.
नांदोस येथील सोमनाथ माळकर व राजाराम गावडे कुटुंबीयांनी विक्रम यादव यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
विक्रम यादव व कुुटुंबीयांनी मालवण येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्य व बाँबे ब्लड ग्रुप रक्तदात्या व मालवण कार्यकारणी सदस्य श्रीम सपना पडवळ यांच्या घरी पाहुणचार घेतला.

पाच वर्षापूर्वी प्रसुती दरम्याने रक्तस्त्रावामुळे गंभीर झालेल्या श्रीमती अंजली हेळकर यांना हा ग्रुप मिळणे असंभव होते असे डॉक्टरनी सांगितले होते, त्यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानकडे पोस्टद्वारे पोहचलेली ही मागणी पुढे विक्रम यादव यांना संध्याकाळी ७ वा पोहचताच, सांगली ते रत्नागिरी असा प्रवास करत विक्रम यादव यांनी रात्रौ १२ वा रत्नागिरीत जिल्हारुग्णालयात पोहचत रक्तदान करुन त्यांचे प्राण वाचविले होते. ते श्रीम.अंजली हेळकर यांचेसाठी जीवनदूत ठरले होते,आज विक्रम सिंधुदुर्गात आलेत हे समजताच श्रीम अंजली यांनी त्यांना फोन करुन आपल्या देवगड येथील माहेरी वडिलांना भेटून जाण्यास सांगितले. विक्रम यांनी त्या निमंत्रणाचा मान ठेवत आज सहकुटुंब देवगडला त्यांच्या माहेरी गेले. व त्यानंतर ते सांगलीसाठी रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!