*कोकण Express*
*कणकवली पटवर्धन चौकात नाकाबंदी | विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले*
*सहकाऱ्यांसमवेत पोलीस निरीक्षक सचीन हुंदळेकर यांचा दणका*
*विनामास्क, विनालायसन आणि एमव्ही ऍक्ट नुसार ६५ जणांवर कारवाई करत १३,००० हजार दंड वसूल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांसह विणामस्क फिरणाऱ्यांवर देखील आज शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.
यावेळी ६५ जणावर कारवाई करत रु १३,००० एवढा दंड वसूल करण्यात आला. पटवर्धन चौकासह नरडवे फाटा येथेही नाकाबंदी केल्यामुळे विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पो.उप.निरीक्षक धनश्री पाटील, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने, रघुनाथ जांभळे,
सुप्रिया भागवत, किरण मेथे, वैभव कोळी, मकरंद माने आदी पोलीस सहकारी या कारवाईत सहभागी झाले होते.