माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण थाटात

माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण थाटात

*कोकण Express*

*माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण थाटात*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध व्हॅन मालवण आपतकालीन ग्रुपकडे सुपूर्द*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात कुठेही आपत्तीची स्थिती निर्माण झाल्यास मालवणच्या या ग्रुपला तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास आता होणार मदत.*

माजी खासदार तसेच भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मालवण आपत्कालीन ग्रुपला देण्यात आलेल्या रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण भाजपा कार्यालय मालवण येथे थाटात झाले.

माणुसकीच्या भावनेतून सेवा देणाऱ्या आपत्कालीन ग्रुपच्या दामू तोडणकर व सहकाऱ्यांचे खरे कौतुक आहे. चिपळूण पूरस्थिती व अन्य आपत्कालीन स्थितीत या ग्रुपने आपला जीव धोक्यात घालून दिलेली सेवा आपण बघितली आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करावे. त्यांच्या सेवकार्यास हातभार लावावा या भावनेतून रेस्क्यू व्हॅन ग्रुपकडे सुपूर्द करताना समाधान वाटत आहे. मात्र आपत्ती कोणावरही येऊ नये ही आपलीही भावना आहे. तरी निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्यात जनतेला तात्काळ मदतकार्य देण्यासाठी आपत्कालीन ग्रुपला अधिक बळ मिळो. अश्या भावना भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केल्या.

राज्यात कुठेही आपत्तीची स्थिती निर्माण झाली की मालवण आपत्कालीन ग्रुपला मदतीसाठी पाचारण करण्यात येते. मात्र घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी रेस्क्यू व्हॅन शासनाकडे मागणी करूनही उपलब्य होत नव्हती. चिपळूणच्या पुर परिस्थितीत मदतीला जाण्यासाठी आवश्यक व्हॅन न मिळाल्याने जाण्यास उशीर झाल्याची खंत दामोदर तोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निलेश राणे साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी ताबडतोब टाटा कंपनीची रेस्क्यू व्हॅन स्वखर्चाने बुक करून उपलब्ध करून दिली.

मालवण आपत्कालीन ग्रुप नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. या ग्रुपच्या माध्यमातून चिपळूण पूरस्थितीत मोठे मदतकार्य करण्यात आले. यावेळी नागरिक अश्या प्रकारे मदतीसाठी टाहो फोडत होती. याचे वास्तव मदतकार्यात सहभागी दामू तोडणकर यांनी मांडले. या मदातकार्यत निलेश राणे यांची मोठी मदत आपल्याला झाली. त्यावेळी *आपत्कालीन ग्रुपला रेस्क्यू व्हॅन देण्याचा दिलेला शब्द निलेश राणे यांनी पूर्ण केला.*

मा. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा वाढदिवसा निमित्त देशात सेवा सप्ताह सुरु आहे. यांचे औचित्य साधून ही व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात कुठेही आपत्तीची स्थिती निर्माण झाल्यास मालवणच्या या ग्रुपला तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास त्याची मदत होणार आहे. ग्रुपच्या सदस्यांनी या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

त्यावेळी उपस्थित भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोडी चिंदरकर, जेष्ठ कार्यकर्ते भाऊ सामंत, जिप वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, सभापती अजिंक्य पाताडे, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिप सदस्य संतोष साटविलकर, शहर अध्यक्ष विजू केनवडेकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, आपत्कालीन ग्रुपचे दामू तोडणकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, उपाध्यक्ष आशिष हडकर, तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक,
गटनेते गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पूजा करलकर, महेश मांजरेकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, मोहन वराडकर, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, अवि सामंत, बबलू राऊत, जगदीश चव्हाण, संतोष गावकर, मनोज हडकर यासह भाजप पदाधिकारी व आपत्कालीन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!