*कोकण Express*
*कणकवली नगरपंचायत शहरातील असंघटीत कामगारासाठी ई – श्रम कार्ड नोंदणी सुविधा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत शहरातील असंघटीत कामगारासाठी ई – श्रम कार्ड नादणी सुविधा उपलब्ध केली आहे . कणकवली नगरपंचायत हद्दीतील असंघटीत कामगारांन 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत ई सेवा केंद्रामध्ये ई – श्रम कार्ड नोंद करुन घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी , कणकवली नगरपंचायत यांनी केले आहे . तरी अधिक माहितीसाठी कणकवली नगरपंचायत कार्यालयातील श्री.अमोल भोगले संपर्क क्र .9421235586 यांच्याशी संपर्क साधावा . असे आवाहन करण्यात आले आहे. ई – श्रम कार्ड साठी लहान व सिमांत शेतकरी , शेतमजूर , सुतार , कुंभार . न्हावी , पशुपालन करणारे , आशा कामगार , अंगणवाडी सेविका , पथविक्रेते , बांधकामगार , दूध उत्पादक , चर्मकार , भाजी आणि फळविक्रेते . ऑटोचालक . गवंडी , लोहार . सुरक्षाकर्मी , प्लंबर , इलेक्ट्रीशियन . शिवणकाम करणारे , बेकरी . पुरोहित . मिटर रिडर , धोबी , दुकान विक्री सहाय्यक , वेटर आदी कामगार ई – श्रम कार्ड नोंदणी करु शकतात . अर्जदार 16 ते 59 वय वर्षे असणारा असंघटीत असावा , तो आयकर भरणारा नसावा . कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा . येताना आधारकार्ड . बँक पासबुक व आधारशी लिक असलेला मोबाईल नंबर द्यावा .