जिल्हा बँक निवडणुकीत बिन विरोधाचे वारे

जिल्हा बँक निवडणुकीत बिन विरोधाचे वारे

*कोकण Express*

*जिल्हा बँक निवडणुकीत बिन विरोधाचे वारे*

*निर्णयाचा चेंडू राजन तेली यांच्या कोर्टात*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आता बिनविरोध निवडणूक करण्याचे वारे वाहू लागले आहेत. आज झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी दर्शवली असून राजन तेली यांनी यात पुढाकार घ्यावा असा सूचक इशारा दिला. त्यामुळे सभागृहातही एकच टाळ्या वाजल्या मात्र, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ठेवीदाराची आहे. ती अन्य कोणाच्या रिमोट कंट्रोल खाली असून नये, केवळ शेतकऱ्यांच्याच रिमोट कंट्रोल खाली चालवावी असे मतही ज्येष्ठ सहकार तज्ज्ञांनी व्यक्त केले. एकूणच सभागृहांमध्ये विद्यमान पॅनल बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याने या बँक निवडणुकीमध्ये बाशिंग बांधलेल्या अनेक जणांचा पत्ता मात्र कट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.*
*जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शरद कृषी भवन येथे झाली. दुपारी बारा वाजता अध्यक्ष आणि संचालक मंडळ बरोबरच तब्बल 395 सभासद उपस्थित असलेल्या या सभागृहांमध्ये मागील इतिवृत्तावर विशेष चर्चा न करता मंजुरी देण्यात आली.* *सभागृहातील जेष्ठ सभासदांनी काही मुद्यांवर आक्षेप घेतला याला बँकेच्या टिपनीतमध्ये नोंद मंजुरी देण्याबाबत ही चर्चा झाली. अखेरच्या टप्प्यात मात्र सभेचा रोख बदलत गेला*
*अध्यक्ष भाषणापूर्वी आयत्या वेळच्या विषयावर फोंडाघाट विकास संस्थेचे चेअरमन राजन चिके यांनी आपल्या संस्थेला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर अध्यक्षीय भाषणामध्ये सतीश सावंत यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले संस्थेने योग्य वेळी पैसे भरलेला दाखला का सादर केला नाही असे सांगून जिल्ह्यातील इतर संस्थांबाबत हा प्रकार का घडलं नाही असेही नमूद केले त्यामुळे बँकेच्या एकूण मतदार याद्यांमध्ये राजकारण आल्याचा संशय सतीश सावंत यांनी खोडून काढला. माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही आक्षेप घेत जिल्हा बँकेमध्ये राजकारण असू नये शक्यतो प्रत्येक सभासदाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून कामकाज व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे लघुउद्योग मंत्रालय असल्याने जिल्ह्यातील व्यावसायिक कर्ज उपलब्ध होईल त्या दृष्टिकोनातून बँकेने योजना आखावी असा मुद्दाही उपस्थित केला मात्र यावर अध्यक्षीय भाषणात सतीश सावंत यांनी बँकेला खादी ग्रामोद्योग मध्ये कर्ज देण्याची मुभा ही तरतूद केंद्र शासनाने करावी यासाठी राजन तेली यांनी पुढाकार घ्यावा असे सभागृहासमोर मांडले. त्यानंतर राजन तेली यांनी विविध विषयावर चर्चा करत बँकेच्या कामकाजाची कौतुक केले अध्यक्षीय भाषणामध्ये सतिश सावंत यांनी राजन तेली च्या यापूर्वीच्या आव्हानाचा मुद्दा उपस्थित करून बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत राजन तेली यांनी मत मांडले आहे असे त्यांना खरोखरच वाटत असेल तर त्यांनी बँकेच्या बिनविरोध निवडणूक करण्याचा पुढाकार घ्यावा, असे सूतोवाच केले त्यामुळे सभागृहांमध्ये प्रचंड टाळ्या पडल्या एकूणच सभागृहांमध्ये विद्यमान संचालक मंडळाबाबत चांगले मत असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली बँकेच्या वतीने प्रतिवर्षी जिल्ह्यातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते या सभेनंतर ही जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह विविध संस्थांना आणि व्यक्तींना जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले यानंतर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनीही आपल्या भाषणांमध्ये जिल्हा बँकेच्या कामकाजाचे कौतुक करून निवडणूक बिनविरोध व्हावी हे सहकारातील सकारात्मक पाऊल आहे मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही बिनविरोध निवडणूक होईल असे आपणास वाटत नाही असा टोलाही लगावला. त्यामुळे एकूण सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सहकारातील ज्येष्ठ नेते श्री. वारंग यांनी मात्र बँकेच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून बँकेची निवडणूक बिनविरोध करायला हरकत नाही. मात्र,यात राजकारण आणू नका रिमोट कंट्रोल हा शेतकऱ्यांच्या हातात राहिला पाहिजे असे सांगून सभागृहाचे लक्ष वेधले सभा संपल्यानंतर मात्र काही मोजकेच लोक सभागृहाबाहेर गेले. उर्वरित 99 टक्के लोकांनी अखेरपर्यंत सभा कामकाज आणि परितोषिक वितरण कार्यक्रमात सहभाग घेतल्याने बँकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण दिसून आले. मात्र, आगामी काळातील राजकीय उलाढाली आणि बँकेच्या निवडणुका हे समीकरण मात्र कशा पद्धतीने असेल हे सांगणे अवघड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!