दापोली नाशिक दापोली वेळ बदलणे संदर्भात आगार व्यवस्थापक यांचा मनमानी कारभारासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार

दापोली नाशिक दापोली वेळ बदलणे संदर्भात आगार व्यवस्थापक यांचा मनमानी कारभारासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार

*कोकण Express*

*दापोली नाशिक दापोली वेळ बदलणे संदर्भात आगार व्यवस्थापक यांचा मनमानी कारभारासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार*

ग्रुप ग्रामपंचायत तिडे तळेघर यांच्या वतीने मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे त्यानुसार ही बस सेवा मंडणगड येथून सकाळी ०७.४५ वाजता सुटते व दापोली आगारा कडून दापोली नाशिक ही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे सदर गाडीची वेळ सकाळी दापोली येथून 6.30 वाजता असल्याने ही गाडी मंडणगड येथे सकाळी सुटणारी मंडणगड नालासोपारा बसला दापोली नाशिक ही बस समांतर होत आहे तेव्हा दोन्ही गाडी बरोबर सुटल्याने मंडणगड नालासोपारा बस भारमान कमी मिळत आहे तरी दापोली आगाराची दापोली कल्याण मार्गे नाशिक बस चा वेळ सकाळी ५.३० किंवा ६.०० वाजता करण्यात यावा या विषयाबद्दलची बोलणी केली असता आगार व्यवस्थापक दापोली आगार मान्य करण्यास तयार नाहीत तुमची गाडीची वेळ बदली करा असे सांगण्यात आले आहे मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा ही बस कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही बस सात ते आठ महिने कायम सुरू असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे दापोली आगाराची दापोली नाशिक सदर बसची वेळ बदलण्यात यावी अशी तक्रार कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती,पुणे कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई गृपचे संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले यांनी ) मा.श्री.अनिल परब परिवहनमंत्री तथा अध्यक्ष, मा.शेखर छन्ने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सो ( भा प्र से), मा.महाव्यवस्थापक (वाहतूक),मा.विभाग नियंत्रक रत्नागिरी,मा.विभागीय वाहतूक अधिकारी,रत्नागिरी विभाग यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!