*कोकण Express*
*साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण…*
महाराष्ट्र शासनातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेस १४ रुग्णवाहीका प्राप्त झाल्या आहेत.त्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त रुग्णवाहीकेचे उद्घाटन आज साटेली भेडशी देवस्थान समिती अध्यक्ष श्री.सदानंद धर्णे,श्री.पांडुरंग धर्णे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या रुग्णवाहीकेमुळे साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
येणार्या काळात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आणि चांगली असावी,यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार असून पुन्हा करोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन डॉ.दळवी यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी दोडामार्ग पंचायत समिती माजी उपसभापती श्री.बाळा नाईक,दोडामार्ग उपनगराध्यक्ष श्री.चेतन चव्हाण,भाजप तालुकाअध्यक्ष श्री.प्रविण गवस,श्री.शैलेश दळवी,रंगनाथ गवस,साटेली भेडशी सरपंच लखु धर्णे,सरचिटणीस संजय सातार्डेकर,महेश धर्णे,सूर्यकांत धर्णे,उपाध्यक्ष योगेश महाले,घोटगे सरपंच श्री.संदिप नाईक,कोनाळ सरपंच श्री.पराशर सावंत,खानयाळे सरपंच श्री.विनायक शेटये,खोक्रल सरपंच श्री.देवेंद्र शेटकर,कल्पना बुडकुले,सुनिल गवस,राजेश फुलारी,भैय्या पांगम,सोमा धर्णे,दशरथ पडते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.