पडेल, मिठबांव, उंबर्डे, नांदगांव येथील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका द्या – सतीश सावंत

पडेल, मिठबांव, उंबर्डे, नांदगांव येथील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका द्या – सतीश सावंत

*कोकण Express*

*पडेल, मिठबांव, उंबर्डे, नांदगांव येथील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका द्या – सतीश सावंत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील पडेल, मिठबांव, वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, कणकवली तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत असून या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
पडेल (ता. देवगड) व उंबडे (ता. वैभववाडी) तसेच मिठबांव (ता. देवगड), व नांदगांव (ता.कणकवली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका नसल्याने तेथील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. तसेच हे चारही ग्रामीण भाग असल्याने, वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी श्री. सावंत यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!