*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँक येत्या काळात देशात अग्रेसर राहील*
*जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेची उद्या, २९ सप्टेंबर रोजी ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ओरोस येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भागधारक १ हजार १७७ संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. यावेळी आर. टी. मर्गज उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले की, २०२०-२१ वर्षाच्या ऑडिट अहवालामध्ये ‘अ’ वर्ग मिळाला नाबार्डमध्येही सातत्याने ‘अ’ वर्ग मिळाला. प्रशासन आणि संचालक यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली असून सहकारी संस्था सहकार्य मिळाले. महाराष्ट्रात जिल्हा बँक अग्रेसर असून सातारा, अकोला संचालकांनी कामाची पाहणी केली. तसेच अधिकाराचे विकेंद्रीकरण केले त्याचा गौरव केला. सहकारात बँकेने बँकिंग सेवांचे विणलेले जाळे याबाबत समाधान व्यक्त केले. वैधानिक लेखापरीक्षण झाले. २२,००९२ ठेवीपर्यंत वाटचाल केली असून स्वनिधी वाढला. तसेच बँकेचा सीडी रेशो ६७.९२ झाला असून ढोबळ नफा ६५ कोटी ९२ लाख निव्वळ नफा १४ कोटी झाला. आर्थिक वर्षात अनेक उपक्रम राबवले, अत्याधुनिक डाटा सेंटर, गटसचिवांना विमा संरक्षण, सात बारा, आठ अ बँकेत द्यायला सुरुवात केली. कोविडमध्ये अनाथ बालकांना मदत, मंगलमूर्ती वाहनकर्ज योजना राबवली, तोक्ते नुकसान आणि अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना ६ टक्के दराने पतपुरवठा, तारकर्ली पर्यटन व्यवसायिकांना ९ टक्के दराने पतपुरवठा बँकेच्या माध्यमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांना पण व्याज परतावा देण्यात आला. सर्वांना अभिमान वाटावा असा कारभार बँकेने केला. जास्तीस जास्त सभासद संस्था प्रतिनिधींनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सावंत यांनी केले.
बँकेने १५ टक्के लाभांश जाहिर केला असून भविष्यात जिल्ह्यातील सीडी रेषो वाढण्यासाठी प्रयत्न करणार असून अजून काही योजना सुरू करणार असे सतीश सावंत यांनी सांगितले. बँकेच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. शिक्षणासाठी दिलेल्या व्याजाचा परतावा दिल्याने त्याचा फायदा होईल. देशात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अग्रगण्य राहिल. आजपर्यंत बँकेच्या कामकाजावर कुणाला आरोप करता आले नाही. तशीच कामगिरी येत्या काळात करण्याचा प्रयत्न करणार. तसेच कोविडचे नियम पळून उद्याची सभा होणार असून त्यासाठी शरद भवनचे ६ हॉल बुक केले नियोजन प्रशासनाने केले असे त्यांनी सांगितले.