*कोकण Express*
*भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत काँग्रेसकडून आंदोलन*
*केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी; वाढत्या महागाईचा निषेध…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
देशातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला आज जिल्हा काँग्रेसने पाठिंबा दर्शवला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढ कमी करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर,समीर वंजारी,विल्यम सालढाणा,शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर,युवक जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे,विभावरी सुकी, सच्चिदानंद बुगडे आदी उपस्थित होते.