*कोकण Express*
*फायनान्स कंपन्यांकडून त्रास असल्यास तक्रार करा ; पोलीस उपायुक्त*
शहरातील विविध प्रकाराच्या फायनान्स कंपन्यांकडून त्रास होत असल्याने पोलिसात तक्रार करा. तात्काळ दखल घेऊन लोकांना सहकार्य करण्यात येईल असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी केले आहे.
शहरातील विविध फायनान्स कंपन्या कार्यरत आहेत. फायनान्स कंपनी कडून काही वसुली कर्मचारी ग्राहकाकडे थकबाकीची वसुली करतेवेळी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत नसल्याने निदर्शनास येत आहे. जर कोणी फायनान्स कंपनी कडून वाहने अथवा इतर वस्तू घेण्याकरिता कर्ज घेतले असेल फायनान्स हप्ते नियमित भरून देखील पैशासाठी त्रास देत असतील व इतर वस्तू ताब्यात घेतली असल्यास पीडित व्यक्तीने त्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन निर्भयपणे नोंदवावी.
आपल्या तक्रारीची पोलीस विभागाकडून तात्काळ दखल घेतली जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.