*कोकण Express*
*शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देवगड काँग्रेसचा पाठिंबा…*
शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे मागे घ्यावेत, तसेच शेती मालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा, यासाठी संपूर्ण भारतात शेतकऱ्यांनी २७ सप्टेंबरला भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला देवगड काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. याबाबतचे निवेदन आज देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर ,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरज घाडी,सेवादल तालुका अध्यक्ष रवी खाजनवाडकर, देवगड शहरअध्यक्ष उमेश कुलकर्णी, धनंजय सारंग, विक्रम राजम, अरुण धुरी व अन्य उपस्थित होते.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गेल्या नऊ महिन्यांपासून देशातील शेतकरी केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि शेतीमालाला हमीभाव देण्याचा कायदा करावा यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत .नऊ महिन्यात सहाशे शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या सीमेवर झाला परंतु केंद्रातील मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही .केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या या मागण्यांबाबत विचार करायला तयार नाही .केंद्रातील मोदी सरकारने केलेले तीन कृषी कायद्यामुळे या देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे हे काम केंद्र सरकाने मोदींच्या काही मित्रांना फायदा करून देण्यासाठी केले आहेत.असा आरोप शेतकर्यांनी केला आहे. आणि यात तथ्य आढळून येत आहे कृषी कायदे पारीत होण्यापूर्वीच या मोदींच्या संबंधित उद्योगपतीने शेतमालाची साठवणूक करण्यासाठी हजारो एकर जमीन मोठी गोदामे बांधली आहेत या कायद्यामुळे देशातील शेतकरी पुन्हा एकदा गुलाम बनणार आहे. स्वातंत्र्यानंतर शेतमजुराला हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी त्यावेळी केंद्रात सत्तेत असणारे काँग्रेस सरकारने कुळ कायदा आणून कसेल त्याची जमीन या न्यायाने शेतमजुरांना भूमिहीनांना जमीन मालक बनवले आता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा हे कायदे आणून शेतकऱ्यांनाच भूमीहीन बनू पाहात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या २७ सप्टेंबर रोजी च्या भारत बंदला संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असून देवगड तालुका राष्ट्रीय कांग्रेस च्या वतीने शेतक-यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आल्याची माहिती उल्हास मणचेकर यांनी दिली.