*कोकण Express*
*सेवा समाप्ती केलेल्या कोरोना योद्ध्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश…*
*पुन्हा सेवेत घेण्याची मागणी; पालकमंत्री उदय सामंत यांना दिले निवेदन…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२७:*
कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तिचा निर्णय शासनाने मागे घेऊन त्याना तात्काळ पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी आज कोरोना योद्धा आरोग्य कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आक्रोश आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.तर याबाबत पालकमंत्री उदय सामंत याना निवेदन सादर केले.
शासनाने ३१ ऑगस्ट पासून सेवा समाप्त केलेल्या आरोग्य कर्मचारी (कोरोना योद्धा) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून मात्र कड़क पोलिस बंदोबस्त ठेवत आंदोलन कर्त्यांना अटकाव करत आपल्या मागण्यांचे निवेदन शांततेत सादर करण्याच्या सूचना केली.त्यानंतर आरोग्य कर्मचारी यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत याना सादर करत पुन्हा सेवेत घेण्याबाबत सहकार्य करावे अशी विनती केली तर पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मागणी बाबत संबंधित मत्र्यांशी चर्चा करून आपल्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आस्वासन यावेळी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन कोव्हीड सेंटर उभारण्यात आली. सदर कोव्हीड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचा-यांना कोव्हीड योध्या म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती. या कालावधीत कोरोना योध्दा म्हणुन कोरोनाची भिती न बाळगता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७२ कर्मचा-यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, सर्व्हट, डाटा इंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, फार्माशिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते. परंतु कोरोना काळात काम करुन देखील कोणतीही पूर्व सुचना न देता ३१ ऑगस्ट २०२१ पासुन शासनाकडून सेवा समाप्त केली आहे. अचानक कामावरून कमी केल्याने कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने याबाबत फेर विचार करावा व शासन सेवेत पुन्हा घ्यावे अन्यथा यापुढिल निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला जाईल.असा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांची दिला आहे. आजच्या आंदोलनामध्ये
अमित वजराटकर ,प्राजक्ता माळवदे,सुमेंधा गावकर ,रेश्मा नायर हार्दिक कदम, सुमन सावंत यांच्यासह मोठ्या संखेने आरोग्य कर्मचारी(कोरोना योद्धा) सहभागी झाले होते.