*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम फोंडाघाट महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग व तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी आजच्या बदलत्या युगाची कास धरली पाहिजे. आपल्या कुटुंबाची सर्व माहिती ऑनलाइन भरली पाहिजे. आपल्या शेतीची नोंद आपल्या सातबारावर आपणच करावी असे मत सिंधुदुर्ग जि. प. चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संदेश सावंत यांनी व्यक्त केले.
कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती साै. सुजाता हळदीवे – राणे म्हणाल्या की , या ॲपद्वारे शेतकर्यांनी आपली पीक पेरा नोंदणी स्वतःच करुन आपल्या परिसरातील इतरांनाही ॲपची माहिती द्यावी.
कणकवली तहसीलदार मा. आर. जे. पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभाग तसेच टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे अॅप मराठी भाषेतून तयार करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्याचा पीकपेरा कोरा असेल त्यांना पीकविमा, पीककर्ज, अनुदान किंवा कोणतीही शासकीय मदत मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी हे अँप डाऊनलोड करून आपला पीकपेरा नोंदविणे अत्यावश्यक आहे. “माझी शेती माझा सातबारा – मीच नोंदविणार माझा पीकपेरा” हा संदेश सर्व विद्यार्थ्यांनी घरोघरी पोहोचवावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. मनीष गांधी यांनी शेतकऱ्यांनी आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या ॲपचा वापर करावा. तसेच तहसील कार्यालयाकडून विविध दाखल्यांसाठी फोंडाघाट महाविद्यालयात कॅम्पचे आयोजन करावे असे सुचविले त्यासाठी संस्थेकडून जे जे आवश्यक सहकार्य लाभेल ते देण्याची ग्वाही दिली.
प्रशिक्षक बाजीराव काशीद यांनी विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड करून पीक पेरा नोंदी कशा करायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानही केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, पंचायत समिती माजी सभापती सुजाता हळदिवे, बबन हळदिवे, सरपंच संतोष आग्रे, आबू पटेल, राजू नानचे, विजय फोंडेकर, मंडल अधिकारी साै. प्रभूदेसाई, तलाठी जयानवारे, ग्रामसेवक चौलकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित सीनियर व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी मानले तर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले.