*कोकण Express*
*राज्यावरील संकटांची मालिका थांबू दे…!*
*रिक्षा संघटनेच्या गणराया चरणी मंत्री उदय सामंत यांचे साकडे…!*
*गणेश दर्शन घेऊन केली पूजा, आरती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यावर संकटांची मालिका सुरू असून ही संकटांची मालिका थांबू दे, असे साकडे कणकवलीच्या राजासमोर राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी घातले.
सिंधुदुर्ग दौर्यावर आलेल्या पालकमंत्र्यानी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी शिवसेनेच आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, अॅड. हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, निसार शेख, कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, भाई परब, अरुण परब, प्रभाकर कोरगावकर, संतोष सावंत, मनोज वारे, रामकांत आरोलकर, संदीप घाडी, श्री. मोर्ये आदीसह रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.