*कोकण Express*
*भारत बंदला कणकवली काँग्रेसचा पाठिंबा*
*कणकवली तहसिलदारांना दिले निवेदन
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतातील शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या २७ सप्टेंबरच्या भारत बंदला जिल्हा काँग्रेस कडून जाहीर पाठिंबा देत, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार आर जे पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा असे निवेदन कणकवली तालुक्याच्या वतीने तहसीलदार आर.जे.पवार यांना देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर,नादीरशहा पटेल, प्रदीप तळगावकर, संतोष तेली, चंद्रकांत पवार, कमलाकर तांबे, अब्दुल काझी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.