*कोकण Express*
*शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी द्यावे*
*विमानतळाचे खरे श्रेय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचेच:राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे. त्यामुळे चिपी विमानतळाचा पाया रचणारे नाम.नारायण राणे हे मंत्री व्हावेत व त्यांच्याच मंत्री पदाच्या काळात विमानतळाचे उद्घाटन व्हावे हे नियतीनेच ठरविले होते.त्यामुळे शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी द्यावे,असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते. राजन तेली म्हणाले,चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होत आहे,जनतेची इच्छा पूर्ण होत आहे.शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत.मात्र, जनतेच्या मनातील काही प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याचे उत्तर द्यावे.विमानतळ जोड रस्ते,पाणी,३३ केव्ही वीज लाईन कुठे आहे?पायाभूत सुविधांचे काय?उद्या पर्यटक आल्यानंतर सेवा मिळाली नाहीत,तर पर्यटक दुसरा पर्याय शोधणार आहेत.मोपा विमानतळ सुरु झाल्यास पुढे काय? असा सवाल करताना राजन तेली म्हणाले, चिपी विमानतळाचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे,आजही हे सरकार पाणी का देऊ शकले नाहीत.खा. विनायक राऊत,माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आताचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगावं,पाणी पुरवठा नळयोजना टेंडर तुमच्याच माणसाने घेतलं आहे.१५ किलोमीटर लाईन टाकली आणि ८ किलोमीटर आजही बाकी आहे.विजेची३३ केव्ही लाईन हवी ती ११ केव्ही कशीबशी झाली आहे,त्याला भाजपने विरोध केला का?कुडाळ पिगुळी मार्गे विमानतळ येथे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था काय आहे?रस्ता प्रश्न सोडविण्यास तुमचे हात कोणी बांधले होते का ? दोन वेळा प्रस्ताव गेले मात्र त्या रस्त्याला आजही मान्यता नाही.खड्डे भरायला पैसे नाहीत.विमानतळ उद्घाटन करायला निघालेत,असा टोला शिवसेना नेत्यांना राजन तेली यांनी लगावला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते,आता पालकमंत्री उदय सामंत आहेत.पायाभूत सुविधांसाठी मानसिकता लागते.म्हापण पासून रुंदीकरण करायचे आहे,त्यासाठी हायवे भरपाईप्रमाणे पैसे द्यावेत.दीपक केसरकर यांची तिसरी टर्म आहे,खासदार यांची दुसरी टर्म आहे.रस्ता, पाणी,वीज प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होत का?उद्या गोव्यातील मोपा विमानतळ झाल्यावर काय होईल.चांगले रस्ते नसतील तर येणारे पर्यटक मोपा विमानतळाकडे जातील याचा विचार करा. आमची केवळ राजकारणासाठी विरोधासाठी विरोध ही भूमिका नाही तर विकास व्हावा ही आमची भूमिका आहे आहे यासाठी सत्ताधाऱ्यांनी विश्वासात घेणे गरजेचे आहे. विमानतळ चालवण्यासाठी पायाभूत सुविधांचे काय?१४ वर्षे झालीत लाईट,पाणी,रस्ते व्यवस्था होण्यासाठी वेळ का लागला?रुंदीकरण होताना पुन्हा अडचण आहेच.क्रेडिट घ्या,पण पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्या.माझा विरोधासाठी विरोध नाही.पर्यटनासाठी विमानतळ महत्वाचे आहे. पर्यटन दिन साजरा होत असताना जिल्हा पर्यटनातून प्रगतीपथावर जावा यासाठी आता तरी सत्ताधाऱ्यानी समस्या सोडवावेत असे राजन तेली म्हणाले. विमानतळ चालवण्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे.पर्यटकांना गोवा ते सिंधुदुर्ग टुरिस्ट बोट चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.जेटी बांधली तर चांगलं होईल.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मदत घ्या,तर त्याला चांगलं यश येईल.पर्यटकांना दळणवळण सोयीचे झाले पाहिजे.स्पीड बोटची व्यवस्था किंवा एसी बसेच ठेवल्या पाहिजेत.वेंगुर्ले व मालवण तालुका विकास आणखी गतीने होईल.रोजगार निर्मिती करण्यासाठी पक्ष मतभेद विसरुन एकत्र येत काम केलं पाहिजे,असे आवाहनही राजन तेली यांनी केले.