*कोकण Express*
*जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवणार ; तर त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जाईल. याबाबत आमच्या नेत्यांची बैठक वरिष्ठ पातळीवर पार पडली आहे. तर त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. दरम्यान गेल्या साडे सहा वर्षात आमच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हिताचीच कामे केली आहेत. कर्ज देताना सुद्धा आम्ही कोणतेही राजकारण केले नाही, त्यामुळे आम्हाला वेगळ्या प्रचाराची गरज नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.सावंत बोलत होते.
यावेळी बँकेचे संचालक व्हीक्टर डॉन्टस, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
श्री.सावंत पुढे म्हणाले, गेल्या साडे सहा वर्षात आमच्या संचालक मंडळाने आरोप होतील असे एकही काम केले नाही. तसेच कर्ज देताना कोणतेही राजकारण न करता नि:पक्षपणे कर्ज दिले आहे. तर बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे झाली आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्हाला वेगळ्या प्रचाराची गरज नाही. दरम्यान येणाऱ्या काळात जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार आहे. तसा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत घेतला आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. असेही ते यावेळी म्हणाले.