*कोकण Express*
*वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची घोडदौड; सुमारे 6 कोटींची उलाढाल लाखात नफा…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने यावर्षी भात विक्रीचा उच्चांक केला आहे.वर्षभरात संघाने 5 कोटी 88 लाख 50 हजार 174 रूपयांची उलाढाल झाली आहे तर 1 लाख 81 हजार 336 रुपये नफा झाला आहे.
भात खरेदी ,खत रासायनिक खते, सेंद्रिय खते, भात बियाणे, पशुखाद्य विक्री ,शेती अवजारे इत्यादी विक्रीतून संघाने हा नफा मिळवला आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वोत्कृष्ट नफा संघाला झाला आहे .गेले अनेक वर्षांपासून डबगाईत आलेला संघ आता उर्जितावस्थेत आणण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाला यश आले आहे.या वर्षात 429 शेतकऱ्यांनी 3945 क्विंटल भात खरेदी करण्यात आली असून भाव प्रमाणे 73 लाख 70 हजार 194 रूपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले .
संघाची एकूण उलाढाल 5 कोटी 88 लाख 50 हजार 174 एवढी झाली असून 31 मार्च अखेर 1 लाख 81 हजार 336 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे .संघाकडे 8 लाख 14 हजार 710 रुपये शिल्लक आहेत.
रासायनिक खते विक्री 1 कोटी 28 लाख 68 हजार 365, सेंद्रिय खते 1 लाख 35 हजार 450 ,भात बियाणे 9 लाख 80 हजार 110, पशुखाद्य विक्री पशुखाद्य विक्री 8 लाख 69 हजार 057,शेती अवजारे 28 हजार 670, संघाचे एकूण 734 सभासद असून भागभांडवल 1लाख 25 हजार 500 रूपये आहे.संघाला ऑडीट वर्ग ” ब” मिळाला आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या कामगिरीबद्दल तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.