फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला

 

*कोकण Express*

*फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा*

*घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार सिंधुदुर्ग कुडाळ येथे केली….*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली आहे. आता घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात यासंबंधी घोषणा केली.

फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!