गेली सव्वा वर्ष बंद असलेला टॉवर कार्यान्वित ; हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाला यश

गेली सव्वा वर्ष बंद असलेला टॉवर कार्यान्वित ; हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाला यश

*कोकण Express*

*गेली सव्वा वर्ष बंद असलेला टॉवर कार्यान्वित ; हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाला यश*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*मळेवाड कोंडूरे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आजगाव येथील मनोरा कार्यान्वीत झाला आहे. आजगाव येथे बी एस एन एल चा मोबाईल टॉवर उभारला होता. मात्र सव्वा वर्ष उलटूनही वारंवार पाठपुरावा करूनही हा टॉवर कार्यान्वित करण्यात आला नव्हता. यामुळे आजगाव, धाकोरे, भोम परिसरातील विद्यार्थी व नोकरदार वर्ग यांचे नेटवर्क नसल्याने फार मोठे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी बीएसएनएल कडे निवेदन देऊन टॉवर सूरू करण्या सदर्भात पाठपुरावा केला. यावेळी 15 ऑगस्ट 2021 रोजी उपोषणाचे निवेदन बीएसएनएल ला मराठे यांनी दिले होते. यावेळी बीएसएनएल चे जिल्हा प्रबंधक देशमुख यांनी हेमंत मराठे यांना लेखी पत्राद्वारे 31 सप्टेंबर 2021 पूर्वी सदरचा टॉवर कार्यान्वित करू. तरी आपण आपले उपोषण करू नये अशी विनंती केली होती. यामुळे मराठे यांनी 15 ऑगस्ट रोजी पुकारलेले आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले. दरम्यानच्या काळात त्यांनी हा टॉवर सुरू होण्यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता. मराठे यांच्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना अखेर यश आल्याने आज अखेर आजगाव येथील बीएसएनएल टॉवर कार्यान्वित झाला असून नेटवर्क देण्यासाठी सज्ज झाला आहे. गेली सव्वा वर्ष बंद असलेला टॉवर कार्यान्वित न करता नुसताच उभा करून ठेवलेला होता. माञ हा टॉवर अखेर कार्यान्वित झाल्याने आजगाव धाकोरे, भोम या परिसरातील ग्रामस्थांनी सरपंच हेमंत मराठे व बीएसएनएल अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. आज हा टॉवर सुरू होऊन नेटवर्क सुरू झाल्याने ग्राहकातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!