सावंतवाडी शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुखपदी संदेश कवठणकर यांची निवड

सावंतवाडी शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुखपदी संदेश कवठणकर यांची निवड

*कोकण  Express*

*सावंतवाडी शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुखपदी संदेश कवठणकर यांची निवड*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कवठणी गावचे सुपुत्र तथा शिवसेना आरोंदा विभागीय संघटक संदेश मारुती कवठणकर यांची सावंतवाडी शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पालकमंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

याबाबत संदेश कवठणकर यांना नियुक्तीपत्र देत त्यांना शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने काम करण्यासाठी त्यांना सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संदेश कवठणकर यांनी आपण सर्वांना घेऊन शिवसेना वाढीसाठी जोमाने काम करून आपल्या पदाला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी सेलचे रुपेश पावसकर, सुधा कवठणकर तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!