*कोकण Express*
*श्रीदेव राधाकृष्ण मंदिरात उद्यापासून ‘अखंड हरिनाम सप्ताह’*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
फोंडाघाट बाजार पेठेचे आराध्य श्रीदेव राधाकृष्ण मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ‘अखंड हरिनाम सप्ताह’ रविवार दिनांक 26 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 2 ऑक्टोंबर या कालावधीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
घटस्थापना, पूजा-अर्चा आणि दैनंदिन पारंपारिक उपक्रम शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून संपन्न करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी आणि माहेरवाशिणी याची नोंद घ्यावी. असे आवाहन देवस्थानच्या कमिटीने केले आहे.