*कोकण Express*
*युवा संदेश प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…*
*सन २०२० साठी आनंद तांबे तर २०२१ साठी वंदना राणे यांची निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यात सन २०२० साठी आनंद मानाजी तांबे (जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव) व सन २०२१ साठी वंदना नारायण राणे (जिल्हा परिषद शाळा कणकवली नं. २) यांची निवड करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांना बुधवारी २९ सप्टेंबर, २०२१ रोजी मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे होणार्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च बक्षिस वितरण कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे हे ५ वे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तींचे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत आणि युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.