कोरोनामुळे शिक्षणाचे संदर्भ बदलले असून अध्यनासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरणे अपरिहार्य ; डॉ.विद्याधर तायशेट्ये

कोरोनामुळे शिक्षणाचे संदर्भ बदलले असून अध्यनासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरणे अपरिहार्य ; डॉ.विद्याधर तायशेट्ये

*कोकण  Express*

*कोरोनामुळे शिक्षणाचे संदर्भ बदलले असून अध्यनासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरणे अपरिहार्य ; डॉ.विद्याधर तायशेट्ये*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

कोरोनामुळे शिक्षणाचे संदर्भ बदलले असून अध्यनासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरणे अपरिहार्य झाले आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनी केले. रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या सहयोगातून वैभववाडी तालुक्यातील दहावीतील विद्यार्थ्यांना सेवाभावी वृत्तीने दिल्या जाणाऱ्या आयडियल स्टडी ॲप बाबत माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नाधवडे येथील अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कणकवली रोटरीचे माजी अध्यक्ष लवू पिळणकर, महेंद्र मुरकर, क्लब लिटरसी चेअरमन नितीन बांदेकर, ट्रेझरर रविंद्र मुसळे, मुख्याध्यापक डी.एस.पाटील नाधवडे,एस.डी.पाटील मांगवली, एस.के.राठोड उंबर्डे, बाबा कोकाटे,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.आतापर्यंत वैभववाडी तालुक्यातील सहा हायस्कूलमधील १४६ विद्यार्थ्यांनी या अॅपचा लाभ घेतला आहे. तालुक्यातील विद्यार्थी अजूनही या संधीचा लाभ घेवू शकतात.

सदर नामांकित अॅपमध्ये १० वीची सर्व क्रमिक पुस्तके,नोट्स, स्वाध्याय,सराव प्रश्नपत्रिका,मूलभूत संबोध व संकल्पना,बहुपर्यायी प्रश्न, नमूना उत्तरपत्रिका,करिअर गाईडन्स आदी उपयुक्त, दर्जेदार माहिती विद्यार्थ्यांना वर्षभर मिळणार आहे.

एन. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त सिध्देश भरडे,प्रणय बोभाटे,सिध्देश तानवडे तसेच प्रांजली कुडतरकर या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!