*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य सभापतींच्या पाठपुराव्याला यश..*
*दोडामार्ग ः प्रथमेश गवस*
कोरोना काळात आरोग्य सेवेत अतिशय महत्वाच्या असणाऱ्या म्हणजे रुग्णवाहीका.दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथील रुग्णवाहीका या जुन्या असल्याने आरोग्यसेवेत बऱ्याच अडचणी येत होत्या.याचा विचार करत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथे नवीन रुग्णवाहीका मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील होत्या.
दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थांची सततची मागणी व सततचा पाठपुरावा यामुळे अखेर दोनही आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहीका मिळाल्या आहेत.त्यामुळे लवकरच या दोनही रुग्णवाहीका प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथे दाखल होतील व आरोग्य सेवेत कार्यरत असताना दिसतील त्यामुळे तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेस बळकटी येईल असा आशावाद डॉ.अनिषा दळवी यांनी व्यक्त केला आहे.