*कोकण Express*
*महाराष्ट्र शासनाने परीक्षार्थींची कुचेष्टा थांबवावी*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत*
शासनाला आरोग्य व्यवस्थेचे गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या कृतीतून दिसून आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य यंत्रणेतील पदभरती होत नसल्याने परंतु कोरोना सारख्या महामारी मध्ये रिक्त पदे प्राधान्य भरणे आवश्यक असल्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने शासनाचे लक्ष वेधले होते. तदनंतर आरोग्य विभागातील गट क व ड ही पदभरती होणेबाबत शासनाने कार्यक्रम देखील जाहीर केला होता. शासनाच्या पदभरती धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता देखील केली होती. या पद भरती बाबत शासनाने तारीख निश्चित केल्याने व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना परीक्षेसाठी परजिल्ह्यातील केंद्र देखील देण्यात आली होती. विहित कालावधीत परीक्षा देता यावी याकरिता जिल्ह्यातील मुलांनी पर जिल्ह्याचा रस्ता देखील पकडला होता. परंतु दिनांक २४.०९.२०२१ रोजी शासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता तांत्रिक कारण पुढे करून राज्यातील सर्व पदभरती रद्द केली आहे. या पद भरतीसाठी सर्व पात्र उमेदवाराने विशेष मेहनत घेतली आहे तसेच पर जिल्ह्यात केंद्र असल्याने त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य देखील केले होते. शासनाची जर परीक्षा घेण्यात असमर्थता होती तर शासनाने यापूर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करता ने होते. परंतु जाहीर केलेले वेळापत्रक अचानक रद्द करून सर्व परीक्षार्थींची चेष्टा केली आहे व आर्थिक नुकसान देखील केले आहे. शासनाने तातडीने ही पदभरती सुरू करावी .शासन कोरोना तिसरी लाट देईपर्यंत थांबणार आहे का असा सवाल अध्यक्ष संजना सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शासनास केला.