*कोकण Express*
*पोलीस नाईक स्नेहा पुजारे यांचे निधन…*
स्नेहा पुजारे या गेल्या चार वर्षापासून देवगड पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत होत्या. त्यांची नुकतीच आचरा पोलीस ठाणे येथे बदली झाली होती. त्यांचे पती मनोज पुजारे हे आचरा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पती, सासू, सासरे, दीर, जाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने आचरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्या पार्थिवावर आचरा देऊळवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.