*कोकण Express*
*गणेशोत्सवानंतर आता जिल्ह्यात कोरोना उत्सवाचे वेध…!*
*वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा आरोग्य प्रशासनाची नियोजनपर बैठक संपन्न..?*
*जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाकडून अँटीजन चाचण्या वाढवत संक्रमित आकडा फुगवून निर्बंध आणण्याची शक्यता..मनसेचा आरोप*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कोरोना आपत्ती कार्यकाळ चालू झाल्यापासून संचारबंदी लागून जनजीवन ठप्प होणे आता जनतेसाठी नवीन राहिलेलं नाही. मात्र राज्य सरकार म्हणा किंवा प्रशासन अशा पद्धतीचं वातावरण कायम ठेवून कोरोना “उत्सव” म्हणून साजरा करत आहे असे चित्र आहे.गणेशोत्सवानंतर आता जिल्हा आरोग्य प्रशासन पुन्हा एकदा उत्सव साजरा करणार असल्याची शक्यता आहे.वातावरण बदलामुळे सद्यस्थित जिल्ह्यात सर्दी, खोकला,ताप अशी साथ असताना आरोग्य प्रशासनाने रॅपिड अँटीजन चाचण्या वाढविण्याचे निर्देश आरोग्य कर्मचाऱ्यांना देत दैनंदिन टार्गेट दिले दिल्याने येणाऱ्या काळात जिल्हा पुन्हा एकदा कोरोनामय करून निर्बंध येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाढलेली महागाई,इंधन दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ,खड्डेमय रस्ते,वाढलेली बेरोजगारी अशा सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठीच “कोरोना आवडे सरकरला” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सरकारकडून जनतेला फक्त वेठीस धरण्याचे काम चालू असून कोरोना वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय व त्यातूनच “टार्गेट” दिली जात आहेत अशी चर्चा आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आहे.त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात कोरोनामय वातावरणाची परिस्थिती निर्माण करून पुन्हा एकदा निर्बंध लादून जनतेस वेठीस धरण्याचा प्रकार घडू शकतो अशी टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.