*कोकण Express*
*ते येड्यागबाळ्याचे काम नाही – आम.नितेश राणे*
*शासकीय मेडिकल कॉलेज मंजुरीत त्रुटी दूर करण्यासाठी सल्ला मागितल्यास केव्हाही तयार!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मेडिकल कॉलेजला मान्यता मिळण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो. मेडिकल कॉलेजला मंजुरी घेणे हे डोक्यावर टोप घालण्याएव्हढे सोपे नाही आणि ते शेमड्यांचे काम नाही, अशा शब्दांत भाजप आमदार नीतेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांची खिल्ली उडवली. मेडिकल कॉलेजच्या मंजुरीच्या प्रक्रियेतून आम्ही गेलो आहोत. त्यामुळे आम्हाला त्याचा पुरेपूर अनुभव आहे.
शासकीय मेडिकल कॉलेज मंजुरीत ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठी आमचा सल्ला घेतल्यास मदतीसाठी केव्हाही तयार असल्याचेही आम. राणे ऑनलाईनद्वारे घेतेलल्या पत्रकार परिषदेत सांगितले. खरच मेडिकल कॉलेज आणायचे असेल तर आमची मदत घ्या, आमच्या अनुभवाचा फायदा घ्या, आम्ही मदत करायला तयार आहोत. त्यासासाठी जॉईंट मिटींग लावा, असे सांगताच याबाबत आमच्यावर जे शेमडे लोक आरोप करत आहेत, ते म्हणजे आपली जबाबदारी दुसर्याकडे झटकण्याचा प्रकार असल्याची टीका आम राणे यांनी केली. मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी खूप किचकट व शिस्तबद्ध काम चालते. मेडिकल कॉलेजबाबत श्रेयवादाचे राजकारण नको. आम्हाला अनुभव आहे. आम्ही मदत करायला तयार आहोत. खासदार पालकमंत्र्यांना आपले आवाहन आहे. परवानगीसाठी मेहनत अभ्यास हवा. ते येड्यागबाळ्याचे काम नाही. अपुरा स्टाफ, लॅबोरेटरी व इतर सुविधा नसताना परवानगी मिळाली म्हणून कसे सांगता? असा सवाल आम. राणे यांनी केला.