*कोकण Express*
*आरोग्य यंत्रणेला ग्रामपंचायत यांच्या सहाय्याने गावनिहाय झालेल्या लसीकरण सर्वेक्षणाच्या सूचना व वयोवृद्ध , दुर्धर आजाराने पीडितांना घरी जाऊन लसीकरण करणार*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत*
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाच्या माध्यमातून लस पुरवठा होत असून प्राप्त लसीचे लसीकरण करण्याची नियोजन देखील आरोग्य यंत्रणेकडून सुनियोजित पद्धतीने होत आहे. परंतु गणेश चतुर्थी कालावधीनंतर लसीकरण करून घेण्यासाठी लोकांची संख्या कमी होत असल्याचे आढाव्या अंती लक्षात येते. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन करून देखील काही गावांमधील लस शिल्लक राहत आहे. लसीकरणाच्या सुरूवातीच्या कालावधीत काही लोकांनी उपलब्ध होत असलेल्या ठिकाणी लसीकरण करून घेतल्याने प्रत्येक गावातील 18 वर्षावरील झालेल्या लोकांचे लसीकरण याची निश्चित माहिती घेणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यांना ग्रामपंचायत यांच्या मदतीने गावनिहाय सर्वेक्षण करून झालेल्या लसीकरणाची माहिती संग्रहित करून उपलब्ध माहितीनुसार यापुढे आवश्यकतेनुसार गावांना लस पुरवठा केला जाणार आहे.तसेच वयोवृद्ध, दुर्धर आजाराने पीडित लोकांना लसीकरणासाठी येणे शक्य नसल्याने त्यांना त्यांचे घरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना देखील आरोग्य यंत्रणेला दिल्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद संजना सावंत यांनी सांगितले.