कुडाळ-मालवण रस्त्यावर जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या “साहसवीर” प्रवाशांचे भाजपाने केले गुलाबपुष्प देऊन कौतुक!

कुडाळ-मालवण रस्त्यावर जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या “साहसवीर” प्रवाशांचे भाजपाने केले गुलाबपुष्प देऊन कौतुक!

*कोकण  Express*

*कुडाळ-मालवण रस्त्यावर जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या “साहसवीर” प्रवाशांचे भाजपाने केले गुलाबपुष्प देऊन कौतुक!*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ मालवण रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. रोजच्या रोज शेकडो लहानमोठे अपघात होत असून गाड्यांचे नुकसान होत आहे. आमदार वैभव नाईक जाहीर पत्रकार परिषद घेत “रस्त्याची जबाबदारी माझी” म्हणत आहेत दुर्दैवी आहे. ज्या गोष्टींची लाज वाटावी त्याचा अभिमान हे आमदार कसा वाटून घेऊ शकतात, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

आज कुडाळ मालवण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांचा भारतीय जनता पक्षाने गुलाबपुष्प देत त्यांच्या साहसाचे उपरोधिकपणे कौतुक केले आहे. आपले मणके मोडत असताना, रुग्णवाहिकेतून रुग्ण जिवन्त जाईल की नाही याची शाश्वती नसताना मुकाटपणे असा सत्ता असतानाही कामे न करू शकणारा आमदार कुडाळ-मालवणच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे, अशी टीका भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा अध्यक्ष संध्या तेरसे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे,माजी नगरसेवक सुनिल बांदेकर, युवा मोर्चा चिटणीस रुपेश बिडये, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तन्मय वालावकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!