आरोग्य कर्मचारी आयटक कामगार संघटनेचा २४ सप्टेंबरला देशव्यापी संप

आरोग्य कर्मचारी आयटक कामगार संघटनेचा २४ सप्टेंबरला देशव्यापी संप

*कोकण  Express*

*आरोग्य कर्मचारी आयटक कामगार संघटनेचा २४ सप्टेंबरला देशव्यापी संप*

*आशा गटप्रवर्तक महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचेे दिले निवेदन*

*सिंधुदुर्गनगरी*

आशा गतप्रवर्तक आरोग्य कर्मचारी आयटक कामगार संघटनेच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी करण्यात येणाऱ्या देशव्यापी संपाबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

महाराष्ट्रातील सर्व आशा व गतप्रवर्टक महिलांनी २४ सप्टेंबर रोजी सर्व काम बंद ठेवून एक दिवसाचा संप पुकारला आहे. शासकीय योजनेमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार व कर्मचारी यांना दरमहा २१ हजार रुपये किमान वेतन द्या, कोविड-१९ मध्ये काम केल्याचा प्रत्साहन भत्ता सुरु केल्याशिवाय आशा कर्मचारी ते काम करणार नाहीत. मागिल पाच महिन्याचे १३ हजार रुपये मानधन व इतर कामावर आधारित मोबदला ८ दिवसांमध्ये द्या. गटप्रवर्तक महीलांचे १८ हजार ४०० रुपये थकित मानधन व इतर रक्कम त्वरीत द्या. आरोग्य वर्धनी योजनेची थकीत रक्कम त्वरित द्या. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना आज निवेदन देण्यात आले. संपातील आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या राज्य शासन निर्णयशी संबंधित असल्यामुळे सदर निवेदन शासनाकडे पाठवण्यात येईल, असे प्रजित नायर यांनी सांगितले. जि. प. मुख्य कार्यकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळांमध्ये सोनल नारींग्रेकर, तृप्ती देसाई, पूजा परब, शारदा खानोलकर, अर्चना रेडकर, मयुरी कोचरेकर, सुलक्षणा रेडकर, राखी परब, दीपाली बांदेकर, गायत्री भरडकर व प्रतिभा ठुंब्रे इत्यादींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!